
परवानगी न घेतल्याने चिपळूण नगर परिषदेला पुलावरील पाईपलाईन काढण्याची नामुष्की
सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता नगरपरिषदेने शहरातील ईन्रॉन पुलावरून टाकलेली ग्रेव्हीटी पाणी योजनेची काढण्याची नामुष्की ओढवली आहे त्यामुळे शुक्रवारपासून कॉंक्रीट तोडण्याचे काम सुरू झाले आहे. ३०० एमएम क्षमतेचे पाईप, त्यावरील कॉक्रिट व योजना सुरू झाल्यावर वाहणारे पाणी यामुळे पुलाला थोका होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईपलाईन काढून टाकण्याच्या सूचना दिल्यानंतर ही कार्यवाही सुरू झाली आहे
काही महिन्यांपूर्वी गोवळकोट भागाकडील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, त्यांना मचूळ, खारट व गढूळ पाणी मिळत होते. यामुळे झालेली ओरड लक्षात घेता या नागरिकांना खेर्डी येथून उचलत्या जाणार्या व खंड परिसरातील साठवण टाकीत येणार्या चांगल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने घाईगडबडीने कोणत्याही परिणामांचा विचार न करता मिरजोळीकडून योजनेची पाईपलाईन टाकली. ती टाकताना गुहागर मार्गावरील मिरजोळी कब्रस्थानसमोरील पूल, उक्ताड बायपास ऍन्रॉन पूल जुने आहेत याचाही विचार करण्यात आला नाही. याहीपेक्षा महत्वाचे म्हणाजे हे फूल ज्या विभागांच्या अखत्यारित येतात त्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.




