
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीबाडी येथील साहिल सुरेश भानडे (१७) या विद्यार्थ्याने गळफास जावून आत्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी एका दवाखान्यात घडली होती. आत्महत्येपूर्वी साहिलने लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली असून यातूनच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघड होताच याप्रकरणी पांडुरंग विठ्ठल शेलार (३५), अनिल बळीराम पवार (३८ सर्व वहाळ), तसेच एक महिला अशा तिघांवर सावर्डे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद सृष्टी सुधाकर भागडे (२९, वहाळ) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल हा १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. तो शिक्षण घेत असताना एका दवाखान्यात काम करत होता. १ ऑक्टोबर रोजी साहिल भागडे याने त्या दवाखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला आहे. साहिलच्या आत्महत्येनंतर पोलिसांना त्याच्या जीन्स पॅन्टच्या मागच्या उजव्या खिशात एक चिड्डी सापडली त्यात गुन्हा दाखल झालेली महिला दवाखान्यात काम करत असताना साहिलचा फोन घेऊन अनिल पवार याच्याशी बोलायची, तिला बोलत असताना पांडुरंग शेलार याने रंगेहाथ पकडले होते. हा सर्व प्रकार साहिलमुळे घडत असल्याचे शेलार याच्यासह संबंधित महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे पांडुरंग शेलार याने साहिलवर दबाव टाकल्याने साहिलची गावात बदनामी झाल्याचा मजकूर साहिल याने लिहून ठेवलेल्या चिडीत नमूद आहे.




