
कमी निविदेच्या रस्ते कामांची होणार तपासणी, पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांच्या चौकशीचा कोणताही विषय थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आला नसला तरी ज्या ठिकाणी कंत्राटदारांनी ३४ टक्के, ३५ टक्के ४० टक्के ते ४२ टक्क्यांपर्यंत ’बिलो टेंडर’ (कमी दराने) भरून कामे घेतली आहेत, त्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाची आणि गुणवतेची कडक तपासणी व्हावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील रस्ते विकास, दापोलीतील वक्फ जमीन प्रकरण आणि मतदार यादी पुनरीक्षणावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर स्पष्ट शब्दात भूमिका मांडली.




