
आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज
ऑगस्ट महिन्यात राज्यात हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले. आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.पुढील काही दिवस राज्याच्या पश्चिम भागातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, कोकण-गोवा परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज 7 सप्टेंबरला कोकण-गोवा भागात पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतरच्या काही दिवसांत उत्तर कोकणात अनेक किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असे म्हटले जात आहे.




