राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या वतीने अर्जुन रावराणे हायस्कूल सभागृहात आयोजित विजयादशमी उत्सवाला आज पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली.

या उत्सवातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते प्रकाश गंगाराम डेंगरकर आणि प्रमुख पाहुणे प्रा. काशिनाथ चव्हाण उपस्थित होते.

राष्ट्रनिर्माण, समाजजागृती आणि देशाप्रती कर्तव्यभावना दृढ करण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अधोरेखित झाले.

भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रहिताची भावना जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button