जिल्ह्यातील 171 शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी


जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक बदल्यांवरून सुरू असलेल्या गदाराेळाच्या कारभाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. संघटनांचा माेठा दबाव आणि प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना दुर्गम भागात पाठवण्याचा घाट घालण्यात आला हाेता. मात्र, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या विशेष हस्तक्षेपाने ेरसमायाेजनानुसार जिल्ह्यातील एकूण 171 शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश अखेर जारी करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद स्तरावरील या कार्यवाहीमुळे 53 वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांना साेयीच्या जागी नियुक्ती देऊन न्याय देण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये सुरू असलेला 53 वर्षांवरील शिक्षकांवर हाेणारा अन्याय यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या वयाेवृद्ध शिक्षकांना साेयीच्या शाळा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले हाेते. मात्र, शिक्षण विभागातील काही अधिकाèयांनी या निर्देशांना बगल दिल्याची शिक्षकांमध्ये जाेरदार चर्चा सुरू हाेती.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामत आणि सीईओ वैदेही रानडे यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अखेर सर्व प्रश्न निकाली काढण्यात आले. 103 अर्जाच्या छाननीनंतर झालेल्या फेरसमायोजनात एकूण 171 शिक्षकांच्या बदल्यांवर शिक्कामाेर्तब करण्यात आले. बदलीप्राप्त शिक्षकांना तत्काळ नवीन ठिकाणी रुजू हाेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button