लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग; लाखोंचे नुकसान


खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काल भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खेड पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button