बी.के.एल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून युवा संवाद व संविधान दिन साजरा


रत्नागिरी, दि. २७ ) : मेरा युवा भारत केंद्र, रत्नागिरी (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) आणि बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, सावर्डे, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त युवा संवाद व संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ अशी होती. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला मेरा युवा भारत, रत्नागिरीचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट विजय पाटील, महाविद्यालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. चेतन जावसेन उपस्थित होते.
यावेळी अंकिता जाधव यांनी युवा संवाद कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची भूमिका याविषयी विचार मांडले. तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्ये आणि संविधानातील मूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणण्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमातून युवकांनी व्यसनमुक्त राहून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेसाठी योगदान द्यावे, असा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button