
भाजपच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी पुतळ्याला पुष्पहार घालून व पुष्प अर्पण करून बाबासाहेबांच्या कार्याला वंदन केले. संविधानाने दिलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हेच आपलं खरं बळ आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांनी दिला. त्यांच्या विचारांवर चालणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, विक्रम जैन, संदीप सुर्वे, मनोज पाटणकर, निलेश आखाडे, राजेंद्र पटवर्धन, शैलेश बेर्डे, समीर वस्ता आदी पदाधिकारी कार्यकर्तेमोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वातावरणात "जय भीम, जय संविधान", डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो चा जयघोष दुमदुमला होता.




