
म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद, तालुक्याच्या अर्थकारणावर परिणाम
बार्जेसने धडक दिल्याने स्ट्रक्चरल ऑडीटच्या कारणामुळे ६ जुलै रोजी अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला म्हाप्रळ-आंबेत पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला करण्यात आलेला नाही. पुलावरून लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू असली तरी एसटी व मोठ्या गाड्यांना प्रतिबंध असल्याने तालुकावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याचा परिणाम आता तालुक्याच्या अर्थकारणावर जाणवू लागला आहे.
या पुलावरून होणारी अजड वाहनांची वाहतूक सध्या अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. तालुक्यातील अर्थकारणाला याचा मोठा फटका बसत आहे. विविध क्षेत्रातील उद्योग, सेवा उद्योगावर यावर मंदीचे मोठे सावट आलेले दिसून येत आहे. मुंबई, पुणे व उपनगरामध्ये जाण्यासाठी मध्यवर्ती असलेल्या माणगाव येथे जाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना महाड मार्गाने साठ किलोमीटर जास्तीच्या अंतराचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे वाढीव इंथन खर्चासह एसटी प्रवाशांना जास्तीचा तिकिटाचा भार सहन करावा लागत आहे.




