रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर निर्भय पॅनल विजयी

त्रैवार्षिक निवडणुकीत अटीतटीची लढत : ८८ टक्के विक्रमी मतदानासह 'एकता पॅनेल'चा धुव्वा

रत्नागिरी : ‘डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, रत्नागिरी’च्या त्रैवार्षिक निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील केमिस्ट सभासदांनी उस्फूर्तपणे मतदान करत ‘निर्भय पॅनेल’च्या हाती संघटनेची सर्व सूत्रे सोपवली आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातून तब्बल ८८ टक्के विक्रमी मतदान झाले.
या निवडणुकीत एमएससीडीएच्या (MSCDA) खजिनदारांचे ‘एकता पॅनेल’ आणि सर्वसाधारण केमिस्टचे ‘निर्भय पॅनेल’ यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत झाली. “मी म्हणजेच संघटना” अशा चाललेल्या एकाधिकारशाहीला आणि मनमानी राजकारणाला सभासदांनी आपल्या मतदानातून जोरदार चपराक लगावली असल्याचे निर्भय पॅनेलकडून सांगण्यात आले. ‘निर्भय पॅनेल’ने प्रतिस्पर्धी ‘एकता पॅनेल’चा पूर्ण धुव्वा उडवत सर्वच्या सर्व जागांवर ऐतिहासिक विजय संपादन केला.
सर्व ९ जागांवर ‘निर्भय पॅनेल’चे वर्चस्व असोसिएशनच्या ९ प्रमुख पदांसाठी हे मतदान पार पडले होते. यात सर्वच्या सर्व जागांवर निर्भय पॅनेलचे उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत.
संघटनेत जिल्हाभरातून केमिस्ट बंधूंनी या मतदानात उस्फूर्त प्रतिसाद दाखवला. त्यामुळे ८८ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. ‘निर्भय पॅनेल’च्या या दणदणीत विजयामुळे रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनमध्ये आता नव्या, पारदर्शक आणि लोकशाही पर्वाला सुरुवात झाली असल्याचे निर्भय पॅनलच्या वतीने सांगण्यात आले आहे.

विजयी उमेदवारांची नावे अशी :
अध्यक्ष : राजेश घोसाळकर
सचिव (सेक्रेटरी) : सचिन कोतवडेकर
खजिनदार : प्रफुल्ल लांजेकर
कार्याध्यक्ष : संदीप गुजर
उपाध्यक्ष : अभिजीत आवळे
सहसचिव (जॉईंट सेक्रेटरी) : रूपेश शेलार
कार्यकारिणी सदस्य : आरिफ मेमन
कार्यकारिणी सदस्य : निहार गुडेकर
कार्यकारिणी सदस्य : मुबीन मालगुंडकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button