कोकण महोत्सवात लोककलासादर करण्याची संधी

चिपळूण – कोकणातील लोककला वृद्धींगत व्हाव्यात, लोककलांचा प्रचार प्रसार व्हावा आणि अशा लोककला जतन व्हाव्यात याकरिता कोकण लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काही ठराविक लोककला सोडता अनेक चांगल्या लोककला आहेत की ज्यांची माहिती कोकणातीलच काही भागांना नाही त्यामुळे अशा गुणात्मक आणि त्या त्या भागाचा सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणाऱ्या लोककलांना संधी देण्याचा मानस लोककला महोत्सव समिती चिपळूण यांनी व्यक्त केला आहे.

यास्तव, ज्या कलाकारांना आपल्या लोककला सादर करण्याची संधी हवे त्यांनी आपले संस्थेची अथवा मंडळाची माहिती आयोजकांना द्यावी. याकरिता आपण आपल्या लोककलांचे फोटो आणि व्हिडिओ संपर्क क्रमांक पाठवावेत. ज्या लोककलांची निवड होईल त्यांना दिनांक 1 १६ व १७ जानेवारी या कालावधी दरम्यान आपली लोककला सादर करण्याची संधी दिली जाईल याशिवाय अशा लोककलाकारांचा सत्कार आणि त्यांना यथोचित मानधन तसेच त्यांचा येण्याजाण्याचा प्रवास खर्चही दिला जाईल अशी माहिती मुख्य आयोजक सतीश कदम मकरंद भागवत व राजेंद्र कुमार शिंदे यांनी दिली. लोककला कलाकारांनी याकरिता ९८५०८६३२६२/९८२२६८८७७१ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button