
ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश; ५१ हजार रुपयांपर्यंत भत्त्याचा लाभ

रत्नागिरी, दि. २० ) : शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत रत्नागिरी येथील मुलांचे शासकीय वसतिगृह (मुरूगवाडा) आणि मुलींचे शासकीय वसतिगृह (शांतीनगर) येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी तात्काळ संबंधित वसतिगृह कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
५१ हजार रुपयांचा आर्थिक लाभ आणि सोयीसुविधा
या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी ४५ हजार रुपये भोजन भत्ता आणि ६ हजार रुपये निर्वाह भत्ता असा एकूण ५१ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. याशिवाय वसतिगृहात मोफत निवास व्यवस्था, अभ्यासासाठी शांत व अनुकूल वातावरण, शुद्ध पिण्याचे पाणी आणि सीसीटीव्ही (CCTV) सुरक्षा व्यवस्था यांसारख्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड व जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- इयत्ता दहावी व बारावीची गुणपत्रिका
- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
संपर्कासाठी क्रमांक
पात्र विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहिती व प्रवेशासाठी मुलांचे शासकीय वसतिगृह (मुरूगवाडा) व मुलींचे शासकीय वसतिगृह (शांतीनगर) येथील कार्यालयात संपर्क साधावा. तसेच गृहपालांचे भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१२३०५९२, ९६२३८१६३६८ किंवा वसतिगृहाच्या कार्यालयीन क्रमांक ९७६४२७४१४६ वर संपर्क साधावा, असे वसतिगृह प्रशासनाने कळविले आहे.




