
अध्यात्म मंदिरात २४ रोजी मंगेश फडके यांचे प्रवचन
रत्नागिरी : रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, अध्यात्म मंदिर येथे मंगेश फडके यांचे प्रवचन मंगळवार दि. २४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उपदेशातील गुढार्थ आणि त्याचे प्रत्यक्ष जीवनातील अनुसरण उलगडणारे ‘तू मन हे मीचि करी’ या विषयावर हे प्रवचन होणार आहे. हे प्रवचन अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे होईल.
गेल्या ३० वर्षांपासून मंगेश फडके यांचे वास्तव्य कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे असून, त्यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत ’व्हाईस प्रेसिडेंट’ पदावर यशस्वी कारकीर्द पूर्ण केली आहे. २०२३ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी व्यावसायिक सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी आपले संपूर्ण जीवन सद्गुरू कार्याला समर्पित केले आहे. ते गेल्या १४ वर्षांपासून अमेरिकेत विनामूल्य बालसंस्कार वर्ग चालवत आहेत. भाविक व अभ्यासकांनी याचा आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




