विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन; खेळ संघटनांनी संपर्क साधण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. २० ) : खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील विनाअनुदानित खेळांच्या जिल्हा व विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित एकविध खेळ संघटनांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून या स्पर्धा पार पडणार असून, इच्छुक संघटनांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधून कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
स्पर्धा आयोजनासाठी संबंधित खेळ प्रकारांच्या एकविध खेळ संघटनांनी नोंदणी प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र, तांत्रिक व आर्थिक सहकार्याचे पत्र आणि स्पर्धा आयोजन मागणी पत्र या आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. स्पर्धा आयोजित करताना संबंधित ठिकाणी सुयोग्य क्रीडांगण, खेळासाठी आवश्यक साहित्य, निवास व्यवस्था तसेच मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व स्वच्छतागृहांची सोय असणे बंधनकारक आहे.
आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांचे खेळप्रकार पुढीलप्रमाणे:

  • जिल्हास्तर स्पर्धा: अष्टे ड्डु आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग सु डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल, क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवर लिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप कॉन दो, युग मुं दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंटयाक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्टडान्स, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, म्युझिकल चेअर आणि टेनिस बॉल क्रिकेट.
  • विभागस्तर स्पर्धा: फिल्ड आर्चरी, सुपर सेवन क्रिकेट, कुराश, लगोरी, बीच व्हॉलीबॉल आणि युग मुं दो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button