
दापोली नगरपंचायतीच्या कारवाईत पडलेली भिंत उभारण्यास सुरूवात
दापोलीः-दापोली नगरपंचायतीने नुकत्याच केलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये दापोली शासकीय धान्य गोडाऊनच्या कंपाऊंडची भिंत पडली. मात्र आता ही भिंत बांधण्यास सुरूवात करण्यात आली असून हे काम नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत असल्याचे तेथील ठेकेदाराने सांगितले आहे.
दापोली नगरपंचायतीने दोन दिवसापूर्वा शहरातील विविध अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत दापोली एसटी स्टॅण्ड परिसरात असणाऱ्या सरकारी धान्य गोडाऊनच्या भिंती लगतही ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई होत असताना गोडाऊनच्या कंपाऊंडची भिंत पडली गेली होती. आता ही भिंत पुन्हा बांधण्यात येत असून याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने सदरचे काम नगरपंचायत करत असल्याचे सांगितले. दरम्यान ही भिंत बांधण्यासाठी वापरण्यात येणारा निधी हा कोणत्या योजनेतून खर्चा पडणार आहे. असा सवाल उपस्थित झाला असून ज्यांनी अनधिकृत व्यवसाय उभे केले त्याच्याकडून हा खर्च वसूल केला जाणार का? की याचा नाहक बोजा दापोलीकरांवर पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचा फोन क्रमांक देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने याबाबत प्रशासनाची बाजू समजू शकलेली नाही.
फोटो डिपी 08-06दापोली धान्य गोडाऊन बाहेर नव्याने बांधण्यात आलेली भिंत




