बॉक्साईटची वाहतूक करणारा भला मोठा ट्रक पांगारी येथे रस्त्याच्या खाली गेला; सुदैवाने जीवितहानी टळली

गुहागर तालुक्यातील पांगारी वनेवाडी येथे जुगाई देवळासमोरील अवघड वळणावर चिपळूणहून येणारा आणि आबलोलीमार्गे काताळे येथे बॉक्साइटचा दगड लोड करण्यासाठी जात असताना पांगरी (ता. गुहागर) येथे जुगाई मंदिर देवळासमोरील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याखाली घसरला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी घडली नाही. झोपेमध्ये किंवा मद्यपान केल्यामुळे चालकांचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्यान घडला. गुहागर तालुक्यातील काताळे येथून रात्री मोठ्या प्रमाणात कर्नाटक येथे बॉक्साईट वाहतूक होत असते. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button