देवरूखात विवाहितेची गळफास घेत आत्महत्या


संगमेश्वर तालुक्यातील देवरूखात विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.सरीता संदेश देवळे (वय-४४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सरीता देवळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण समजू शकलेले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरिता देवळे यांचे मूळ गाव करंबेळे आहे. त्यांचे पती संदेश शांताराम देवळे यांचा देवरुख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. तर सरिता या एका पतसंस्थेच्या पिग्मी गोळा करण्याचे काम करत होत्या. हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने देवरूख केशवसृष्टी येथे राहत होते. सोमवारी दुपारी सरीता यांनी देवरूख केशवसृष्टी येथील राहत्या घरी नायलाँनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. संदेश देवळे हे दुपारी वडापावचे दुकान बंद करुन घरी गेले. तेव्हा त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत देवरुख पोलीसांना खबर मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button