राजवाडीतील सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

संगमेश्वर : राजवाडी येथील प्राचीन व जागृत श्री सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरासह पायवाटा आणि ऐतिहासिक दीपमाळ हजारो पणत्यांनी सजविण्यात आल्याने परिसर प्रकाशाने उजळून निघाला.

मंदिराच्या प्रवेशद्वारापासून पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रांगोळी व पणत्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुण वर्गासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपोत्सवामुळे परिसरात भक्तिमय व विलोभनीय वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button