
श्रीकृष्ण युवक मंडळ मुंबई सह ग्रामस्थ रांगव गवळी वाडी यांच्या लोकसहभागातून हौदा चा डोह नदीवर वनराई बंधाऱ्यांची उभारणी
*👉 श्रीकृष्ण युवक मंडळाचा जलसंधारणासाठी पुढाकार; संतोष थेराडे व दत्ता शेठ लाखन यांचे ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक.
तसेच या कामासाठी पंचायत सदस्य श्री. दत्ता शेठ लाखन यांनी JCB देवून मोलाचे सहकार्य केले.
निसर्गाने कितीही आव्हाने उभी केली, तरी त्यावर मात करण्याची ताकद माणसामध्ये असते. ही ताकद एकजुटीने आणि संघटितपणे वापरली तर कोणतेही संकट परतवून लावता येते, याचा प्रत्यय संगमेश्वर तालुक्यातील श्रीकृष्ण युवक मंडळाने राबविलेल्या जलसंधारण उपक्रमातून येत आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने लोकसहभागातून वनराई बंधारे उभारले असून, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
श्रीकृष्ण युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप थोरावशे अणि सचिव श्री. संजय चिले, श्री. सुधाकर भालेकर यांनी ग्रामस्थांना जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाणीटंचाईचे संभाव्य संकट ओळखून गावातील पाण्याचे स्रोत टिकविणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे आणि भूजलपातळी वाढविणे या उद्देशाने वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली आहे.
▪️या उपक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कडवई जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य संतोष थेराडे साहेब यांची मोलाची साथ लाभली. तसेच पंचायत समिती सदस्य दत्ता लाखन साहेब तसेच संगमेश्वर तालुका कृषी सहायक श्री. राहुल सुळे यांनीही या जलसंधारणाच्या कामासाठी मदत केली.
▪️यावेळी दत्ता शेठ लाखन यांनी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ शासनाच्या मदतीची वाट पाहून चालणार नाही. गावातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व ओळखून जलसंधारणाच्या कामात सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच राहुल सुळे साहेब यांनी कृषी विभागाच्या शासनाच्या विविध योजना सांगितल्या अणि त्यांची पूर्तता करण्यासाठी कायम तुमच्या सोबत राहणार असे सांगितले. संजय चिले दिलीप थोरावशे सुधाकर भालेकर यांनी ग्रामस्थांना एकत्र आणून वनराई बंधारे उभारण्याचा घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. गावातील लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवले तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही. आज अडवलेला पावसाचा प्रत्येक थेंब उद्याच्या पाणीटंचाईत मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक गावाने अशा प्रकारचे उपक्रम राबवून पाणी जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
▪️यंदाच्या पावसाचे प्रमाण आणि आगामी उन्हाळ्यात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेले हे काम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
▪️पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, पाणी जमिनीत मुरविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लोकसहभाग, श्रमदान आणि सामूहिक नियोजनाच्या बळावर श्रीकृष्ण युवक मंडळाने जलसंधारणाचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
▪️एकजुटीतून जलसंधारण आणि लोकसहभागातून पाणीसमृद्ध गाव, असा संदेश देणारा श्रीकृष्ण युवक मंडळाचा हा उपक्रम आगामी काळात इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
धन्यवाद
आ.
अध्यक्ष/ सचिव




