दारूच्या नशेत विषारी तणनाशक औषध घेतल्याने धवडेतील ४२ वर्षीय इसमाचा मृत्यु !

खेड : – तालुक्यातील बांद्री भागातील धवडे गावातील फौजदारवाडी येथील ४२ वर्षीय सचिन अर्जुन जाधव यांचे दारूच्या नशेत विषारी तणनाशक औषध घेतल्याने मुंबई परेल येथील केईएम रुग्णालयात ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५५ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. याची माहिती येथील पोलीस स्थानकात प्राप्त झाल्यानंतर दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५:२३ वाजता दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ., मयत सचिन अर्जुन जाधव याने दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत एम.क्वाईट हे विषारी तणनाशक औषध प्राशन केल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याठिकाणी उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई- परेल येथील केईएम हाॅस्पीटलमधील वार्ड क्रमांक २० मध्ये दाखल करण्यात आले, त्याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करत असतानाच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५५ वाजताच्या सुमारास मयत म्हणून घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button