खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित रांगोळी स्पर्धेत देवरुख चे विलास रहाटे सर्वप्रथम

विजेतेपदाचे जिंकले १ लाखाचे बक्षीस

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व संस्कार भारती च्यावतीने दिवाळी निमित्ताने आयोजित “संस्कार भारती आणि पोट्रेट रांगोळी स्पर्धा: २०२६”मध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी पोट्रेट रांगोळी स्पर्धा प्रकारात विजेतेपदासह १लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले.

विलास रहाटे यांचा
१लाख ₹ रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सदर रांगोळी स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत प्राथमिक फेरीत सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते, या स्पर्धकांमधून अंतिम स्पर्धेकरिता १२ रांगोळी कलाकारांची निवड करण्यात आली. यानंतरची अंतिम फेरी गणेश मंदिर, डोंबिवली येथे पार पडली.
या अंतिम स्पर्धेकरीता कलाकारांनी स्वतः स्केच करून रांगोळी साकारण्यासाठी बारा तास वेळ देण्यात आली होती.

विलास रहाटे यांनी अमेरिकन आदिवासी महिलेचा चेहरा रांगोळीद्वारे साकारला होता.
श्री. रहाटे यांनी या मोठ्या यशाविषयी बोलताना सांगितले की, अनेक दिग्गज रांगोळी कलाकार यामध्ये सहभागी झाले असल्यामुळेरांगोळीसाठी फोटो निवडणे ही एक कसोटी होती. मला मनासारखा अमेरिकन आदिवासी महिलेचा फोटो मिळाला. आयोजकांनी दिलेल्या वेळेत स्वतः स्केच करून अजिबात विश्रांती न घेता मोठ्या मेहनतीने ही रांगोळी पूर्ण केली.

कलेवर असणारी श्रद्धा व प्रेम, स्वतःच्या मेहनतीवरील विश्वास आणि माझ्या मनातील जिद्द यामुळे हा यशाचा मार्ग मला सापडला असल्याचे रहाटे यांनी नम्रपणे नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button