
रत्नागिरी शहरानजीक रेल्वेफाटा येथे रिक्षाचालक-मिरची विक्रेत्यांची भर रस्त्यात हाणामारी
रत्नागिरी शहरानजीकच्या अत्यत गजबजलेल्या रेल्वे स्थानक फाटा परिसरात मुख्य महामार्गावर रिक्षाचालक आणि विक्रेते यांच्यात जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वावातून सुरू झालेल्या या राड्याचे पर्यवसान लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत झाले. या हाणामारीने महामार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.
रेल्वे स्थानक फाटा येथे रिक्षा उच्या करण्याच्या जागेवरून किंवा विक्रेत्यांच्या बसण्याच्या ठिकाणावरून वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. मात्र काही वेळातच दोन्ही गट आक्रमक होऊन – एकमेकांवर धावून गेले. भररस्त्यात सुरू असलेल्या या मारामारीमुळे स्थानिक नागरिकांचीही मोठी धावपळ उडाली. त्या नागरिकांनीही दोन्ही गटातील लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद इतका विकोपाला गेला आणि दोन्ही गट एकमेकांना चांगलेच भिडले. त्यातील महिलांची हाणामारी सोडवताना उपस्थितांनाही नाकीनऊ आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यान दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत.www.konkantoday.com




