आमदार किरण सामंत १७ नोव्हेंबरला लांजा-राजापूरमधील सात रेल्वे स्थानकांची पाहणी करणार!

रेल्वे प्रवाशांच्या समस्या, प्रवासी सुविधा आणि रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाचा घेणार आढावा; स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार

लांजा : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि रेल्वे स्थानकांवरील विविध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आमदार किरण (भैय्या) सामंत हे मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत.

या दौऱ्यामध्ये आमदार सामंत हे लांजा आणि राजापूर तालुक्यातील एकूण सात रेल्वे स्थानकांना भेट देणार असून, प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्थानकांची सद्यस्थिती, प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, फलाटांची व्यवस्था, निवारा, प्रकाश व्यवस्था, रेल्वे गाड्यांचे थांबे तसेच इतर आवश्यक सुविधांची पाहणी करणार आहेत.
यावेळी रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी, स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि रेल्वे प्रशासनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. संबंधित रेल्वे स्थानकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

👉🏻आमदार किरण सामंत यांचा रेल्वे स्थानक पाहणी दौरा पुढीलप्रमाणे :

👉🏻१) सकाळी ११.०० वाजता – निवसर रेल्वे स्थानक, ता. लांजा

👉🏻२) दुपारी १२.०० वाजता – अंजनारी रेल्वे स्थानक, ता. लांजा

👉🏻३) दुपारी १.०० वाजता – आडवली रेल्वे स्थानक, ता. लांजा

👉🏻४) दुपारी २.०० वाजता – वेरवली रेल्वे स्थानक, ता. लांजा

👉🏻५) दुपारी ३.३० वाजता – विलवडे रेल्वे स्थानक, ता. लांजा

👉🏻६) सायंकाळी ४.३० वाजता – सौंदळ रेल्वे स्थानक, ता. राजापूर

👉🏻७) सायंकाळी ५.३० वाजता – राजापूर रोड रेल्वे स्थानक, ता. राजापूर

रेल्वे हा कोकणातील नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, स्थानिक रेल्वे स्थानकांचा विकास व्हावा आणि प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य न्याय मिळावा, या उद्देशाने आमदार किरण सामंत हे प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.या पाहणी दौऱ्यामुळे लांजा-राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या आणि मागण्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असून, संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button