
शंभराव्या साहित्य संमेलनासाठी ५ कोटींचा निधी
पुण्यामध्ये भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला असून, यानिमित्त होणार्या ’९९ नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
तसेच परदेशात होणार्या १२ संमेलनांसाठी सीएसआरच्या माध्यमातून दोन कोटी तसेच तसेच विद्यापीठामध्ये होणार्या १३ विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे राज्यातील तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटी रुपये देणार, असा एकंदरीत १८ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेची वास्तू अद्ययावतसाठी एक कोटीचा धनादेशही त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपविला.




