
जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आज जैतापुरमध्ये राबविली स्वच्छता मोहिम, मंडळ कौतुकास पात्र
दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमानावर राबविणाऱ्या जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीने आज जैतापुरच्या प्रवेश द्वारावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. श्रमदान करुण मंडळाच्या अनेक कार्यकत्यानी या मोहिमेंत भाग घेत या भागाचे रुपडेच पालटविले.

या भागात मोठ्या प्रमाणात रान, झूड़पे वाढली होती. पुरातन तळे, सार्वजनिक विहिर,एस्टी स्टैंड भागात अस्वच्छता झाली होती. सार्वजनिक विहिरीवर भले मोठे झाड वाढले होते, आजूबाजूला रानही मोठ्या प्रमाणात वाढले होते.ही स्वच्छता करण्यात आली.महावितरण ने भूमिगत विजवाहिनी टाकलेल्या ठिकाणी भलामोठा चर पड़ला होता. तो काळी खड़ी टाकून बुजविण्यात आला. पिंट्या पालकर,बाबुली पेडनेकर आणि मनिष करगुटकर यांनी दोन ग्रास कटर च्या सहाय्याने सम्पूर्ण रान कापून काढले.तळ्याच्या कठड्यावर वाढलेली झूड़पे कापुन काढण्यात आली.या पारिसरात ये जा करणाऱ्या अनेक नागरिकानी या कार्यकर्त्ताचे कौतुक केले. जैतापूरचे सरपंच राजप्रसाद राउत आणि ग्रामपंचायत सदस्य आड़विरकर गुरूजी यांनी उपस्थित राहत कार्यकर्त्ताचा उत्साह वाढविला.नितिन परकर,दळे यांनी कटर उपलब्ध करुण दिले.
जैतापूरचे हे प्रतितयश मंडळ दरवर्षी अनेक उपक्रम राबवते. तालुका,जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवर या मंडळाच्या कार्याची दखल घेतली जाते. दरवर्षी हे मंडळ अनेक स्पर्धेत बक्शीसे मिळवते. या वर्षीच्या उपक्रमाना धडाक्यात सुरुवात झाली असून अनेकानी मंडळाच्या उपक्रमाना भरभरून दाद दिली आहे.
मंडळाच्या जैष्ठ सदस्या तथा जैतापुरच्या माजी सरपंच शैलजा माजरेकर,आदर्श पुरस्कार विजेत्या निवृत्त मुख्याध्यापिका प्रियांका नार्वेकर,मा. तंटामुक्ति अध्यक्षा मंगल मयेकर या बाहेर असल्यामुळे त्यांनी मंडळाच्या कार्याला फोन करुण शुभेच्छा दिल्या व लवकरच आपण राजाच्या टीम मध्ये सामिल होऊ असे आश्वस्त केले.
या मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर,उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, सचिव राकेश दांडेकर, सहसचिव प्रसाद माजरेकर, पत्रकार राजन लाड़, खजिनदार सुनिल करगुटकर,सुहास पवार,मनिष करगुटकर,माजी अध्यक्ष संदीप चव्हाण, महेश नारकर, डेकोरेटर शशांक पावस्कर,उत्सव कमिटी अध्यक्ष बाबुली पेड़नेकर, उपाध्यक्ष परेश भाटकर,दशरथ चाळके,पिंट्या पालकर,गजानन करमळकर,बाबाराम पारकर आदी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.सर्वाच्या सहकार्याबद्द्ल अध्यक्ष गिरीश करगुटकर यांनी आभार मानले.




