रोटरी आणि इनरव्हील तर्फे मत्स्य महाविद्यालयात रक्तदान कार्यक्रम यशस्वी :

रोटरी क्लब रत्नागिरी मीड टाऊन, इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाउन आणि मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाला.

एक जुलैपासून रोटरी परिवाराचे नवीन वर्ष सुरू होत असते. रोटरी परिवार समाजसेवेमध्ये महत्त्वाचे कार्य करीत आहे. आपल्या वर्षाची सुरुवात रक्तदान कार्यक्रम आयोजित करून करण्यात यावी असा संकल्प यावर्षी घेण्यात आला. त्याप्रमाणे शिरगाव रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीच्या डॉक्टरांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक, इनर विल क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन चे सदस्य, आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 23 बाटल्या रक्त रक्तदात्यांकडून गोळा केले.

मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अनिल पावसे यांनी रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन चे अध्यक्ष डॉ संदीप करे, सेक्रेटरी श्री सिताराम सावंत, दादा कदम, डॉ वामन सावंत, श्री अमर आयरे, श्री हिराकांत साळवी, कु. आकांक्षा साळवी आणि मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ संदेश पाटील यांनी इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्ष सुवर्णा चौधरी, सदस्य डॉ प्रियांका कांबळे, श्रद्धा सावंत, प्रज्ञा गांधी, सोनाली आयरे यांचे तसेच वैद्यकीय टीमचे पुष्प देऊन स्वागत केले.

उपस्थितांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना रक्तदान विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर रक्तदान कार्यक्रमास सुरुवात झाली. सुमारे साठ स्वयंसेवकांचे रक्तगट तपासणी करण्यात आली. यापैकी 23 स्वयंसेवक रक्तदान करण्यास योग्य असल्याचे आढळून आले. सर्व आयोजकांनी रक्तदात्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

सर्व रक्तदात्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ . डबीर पठाण, मत्स्य अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मत्स्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ संदेश पाटील, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुशील कांबळे, क्रीडा अधिकारी डॉ मंगेश पाटील, मत्स्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक तौसिफ काझी, निलेश मिराजकर, मयुरी डोंगरे आणि सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे कार्य केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button