
चिपळूण उड्डाणपूल विस्ताराचा प्रश्न मार्गी लावणार, आमदार नीलेश राणे यांचे आश्वासन
चिपळूण तालुक्यातील उड्डाणपुलाचा पाग विश्रामगृहापर्यंत विस्तार करण्याचे आश्वासन आमदार नीलेश राणे यांने दिले आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने येथील शिष्टमंडळाने मुंबई येथे राणे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी यासाठी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या रखडलेल्या कामाला गती येणार आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत हा पूल शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र तो प्रांत कार्यालयापर्यंतच होणार असल्याने अनेक समस्या निमणि झाल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून पाग पॉवरहाऊस परिसरासह अन्य ठिकाणी सातत्याने अपघात घडत असून वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाला न्याय मिळावा आणि उड्डाणपूल लवकरात लवकर पाग विश्रामगृहापर्यंत करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.



