भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण


रत्नागिरी, दि. 13 ):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी 15 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आयोजित मुलाखतीस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे 8 जून रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑॅफ सैनिक वेलफेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील सीडीएस -67 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेवून यावे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे.
सदर सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. याचबरोबर उमेदवाराने लोकसंघ आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परिक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button