दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील पालवी महिला प्रभाग हाऊसबोटीचा प्रकल्प राबवणार.

जिल्हा परिषद रत्नागिरी, सिंधू रत्न समृद्धी योजना आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारलेला हा प्रकल्प दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील पालवी महिला प्रभाग संघाच्या हाती सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या हाऊसबोटीची मालकीही महिलांकडेच असल्याने ’स्वावलंबन’ या संकल्पनेला प्रत्यक्ष अर्थ प्राप्तः झाला आहे.
सुमारे ३२० महिला बचत गठाचा समावेश असलेल्या या प्रभाग संघातून निवडलेल्या १३ महिलांनी हाऊसबोटीवर प्रत्यक्ष कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. आदरातिथ्य, स्वच्छता, स्वयंपाक, पर्यटक सेवा अशा विविध विभागांत या महिलांची सुबक विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेनुसार जबाबदार्‍या देण्यात आल्या असून, या उपक्रमातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांना थेट मानधन मिळणार आहे. उर्वरित निधी प्रभाग संघाच्या माध्यमातून पुन्हा विविध उद्योगांमध्ये गुंतवला जाणार असल्याने ही संकल्पना केवळ रोजगारापुरती मर्यादित न राहता सामूहिक आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button