
जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत दिव्यांग तपासणी शिबिरे देवरुख, दापोली, मंडणगड, कामथे, राजापूर, गुहागर व कळंबणी येथे होणार शिबिरांचे आयोजन जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन
रत्नागिरी, दि. १ ) : जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये दि. १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा संबंधित परिसरातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
- ६ ऑक्टोबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, देवरुख
- १५ ऑक्टोबर २०२६ : उपजिल्हा रुग्णालय, दापोली
- २२ ऑक्टोबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, मंडणगड
- २७ ऑक्टोबर २०२६ : उपजिल्हा रुग्णालय, कामथे
- २ नोव्हेंबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, राजापूर
- ९ नोव्हेंबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, गुहागर
- १६ नोव्हेंबर २०२६ : उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी
या सर्व शिबिरांमध्ये दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, संबंधितांनी दिलेल्या तारखेनुसार जवळच्या शासकीय रुग्णालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




