मंडणगड-दापोली मार्गावर एसटी बस-दुचाकीचा भीषण अपघात


दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


दापोली : मंडणगड-दापोली मार्गावर शनिवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगडकडून दापोलीच्या दिशेने एसटी बस येत होती. त्याचवेळी दापोलीकडून मंडणगडच्या दिशेने दुचाकीस्वार जात होता. खेडी येथील इंगळवाडी स्टॉपजवळ, एसटी स्टॉपलगतच्या दुकानाजवळ हा अपघात झाला. यावेळी दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर दुर्घटना घडली.

ही घटना शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button