भाजपच्या प्रकोष्ठ, सेलच्या जिल्हा संयोजकांच्या नियुक्त्या जाहीर


रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली घोषणा


रत्नागिरी, ता. १४ : भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रकोष्ठ (सेल) यांचे संयोजकांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहिर केल्या. यापूर्वीपासून काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षसंघटन अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पक्षाचे विचार व धोरणे जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचतील, असा विश्वास श्री. यादव यांनी व्यक्त केला. प्रकोष्ठ (सेल) संयोजक म्हणून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यापूर्वी श्री. यादव यांनी ओबीसी, अल्पसंख्यांक, किसान, युवा, महिला मोर्चा आदी मोर्चांच्या अध्यक्षांची नियुक्ती केली होती. आता अनुसूचित जमाती मोर्चा संदीप भिसे यांची नियुक्ती केली आहे.

प्रकोष्ठ (सेल) आणि संयोजक या क्रमाने- आध्यात्मिक आघाडी- संजय साळवी, मच्छीमार सेल- अभय लाकडे, बुद्धिजीवी सेल- सदानंद भागवत, पदवीधर सेल- मनोज पाटणकर, सांस्कृतिक- हेरंब जोगळेकर, पंचायत राज व ग्राविकास- नरेंद्र बेलवलकर, जिल्हा ट्रान्स्पोर्ट- नंदकुमार चव्हाण, आयटी सेल- अनिरुद्ध फळणीकर, क्रीडा सेल- दत्ता नार्वेकर, शिक्षक सेल- अभिजित सप्रे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल- राजेंद्र फाळके, कायदा सेल- मिलिंद तांबे, दक्षिण भारतीय सेल- विजयकुमार नाडर, भटके विमुक्त आघाडी सेल- संतोष केदारी, कामगार आघाडी- राजू मयेकर, सहकार आघाडी- राजन पटवर्धन, सोशल मीडिया सेल- संदेश ओक, जैन प्रकोष्ठ- अमित जैन, आयुष्यमान भारत- पुंडलिक पावसकर, बेटी बचाओ बेटी पढाओ सेल- सौ. मृणाल घटे, गो माता संरक्षण आघाडी- अविनाश गुरव, एनजीओ सेल- भगवतसिंह चुंडावत, पंचायत राज- भास्कर सुतार, व्यवसाय सेल- प्रमोद खेडेकर, औद्योगिक सेल- गजानन जाधव, रेल्वे सेल- शंकर शिंदे, बचत गट समन्वयक केंद्र – सौ. अनुष्का शेलार.

रिक्षा ड्रायव्हर सेल- अजय शिंदे, कोकण विकास सेल- डॉ. चंद्रशेखर निमकर, चित्रपट, नाट्य सेल- सौ. सीमा रानडे, सार्वजनिक गणपती व साई मंडळ सेल- महेश महाडिक, मजूर सेल- अजित पवार, पशुसंवर्धन आघाडी- जयेश विचारे, अभियांत्रिकी सेल- अभिषेक साळुंके, एक भारत श्रेष्ठ भारत सेल- अभय चितळे, फ्रेंड्स ऑफ बीजेपी- तेजस शिंदे, बॅंकिंग सेल- रत्नदीप देवळेकर, केमीस्ट व फार्मासिस्ट सेल- मधुकर निमकर, युवा वॉरियर सेल- अभिषेक जागुष्टे, मीडिया सेल- रूपेश आवले.

भाजपमधील ज्येष्ठांसह युवकांनाही यामध्ये संधी देण्यात आली आहे. यामुळे भाजप पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी नवीन संयोजक, मोर्चांचे जिल्हाध्यक्ष प्रयत्न करतील, असे या नियुक्त्यांवरून दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button