संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात धक्कादायक प्रकार, लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची 3.50 लाख रुपयांची फसवणूक


लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची 3.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात हा व्यवहार झाला असून, दोन अनोळखी आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणी दिलेश प्रकाश गुजर (रा. बेनी खुर्द गुजरवाडी) 20 एप्रिल रोजी लांजा येथील यंग लुक या कपड्याच्या दुकानात कामावर असताना हा प्रकार घडण्यास सुरुवात झाली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती या दुकानात आल्या. त्यांनी शी जवळीक साधत, आमच्या गावाकडे लग्न आहे आणि सध्या आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत आहोत, असे भासवले. आमच्याकडे काही जुन्या धाटणीचे सोन्याचे दागिने असून ते आम्हाला तातडीने विकायचे आहेत, अशी बतावणी त्यांनी केली. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे असलेले जोंधळी मणी आणि तारेत गुंफलेले हारासारखे दागिने दाखवले. या दागिन्यांची खात्री करून घेण्यासाठी आरोपींनी हारातील दोन-तीन मणी फिर्यादींना दिले.

दिलेश गुजर यांनी त्या मण्यांची तपासणी केली असता ते खरे सोने असल्याची त्यांची खात्री पटली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या 7046354163 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून संपूर्ण दागिने 3 लाख 50 हजार रुपयांना देण्याचे मान्य केले. हा आर्थिक व्यवहार संगमेश्वर एसटी स्थानके . ी यांनी 3 लाख 50 हजार रुपये आरोपींच्या स्वाधीन केले आणि दागिने ताब्यात घेतले. मात्र काहीवेळाने त्या दागिन्यांची पुन्हा सखोल तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुजर यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button