
नागपुरात कॉम्बिंग ऑपरेशन, 80 दंगलखोरांना अटक;
उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या वतावरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शहरातील महाल भागात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे.तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे नुकसान झालं आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून काल (17 मार्च) उशीरापर्यंत कसोशीने प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तर रात्रभरात जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.दुसरीकडे, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने दंगल होत असताना सुमारे दीड हजार वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर करडी नजर ठेवून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे 150 आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती आहे. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांवरही दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचं सायबर सेलला वाटतंय. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकणाऱ्या विरोधात कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.
नागपूरमध्ये सध्या तणावपूर्व शांतता आहे. किंबहुना महाल भागात पोलीसांचा तगडा बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर परिसरात संचारबंदी धारा 144 लागू करण्यात आली आहे. रात्रभर पोलिसांनी अटक सत्र सुरु करून जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर जवळपास 1800 सोशल मीडिया सायबर पोलिसांकडून सर्च करण्यात आले आहे.