
नाटे येथे मच्छिमारी जाळी, शिसे चोरीला
राजापूर तालुक्यातील नाटे गणेशनगर येथे सुमारे दीड लाख रुपये किंमतीची मच्छिमारी जाळी व १ हजार किलो वजनाचे शिसे अज्ञाताने चोरून नल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदिब कासम पावसकर (रा. साखरीनाटे) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिब पावसकर हे मच्छिमार व्यावसायिक हनिफ काझी यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे मच्छिमारी बंद असल्याने मच्छिमारी नौकेेवरील सर्व जाळ्या नाट्ये गणेशनगर येथील मुजिब गोवळकर यांच्या बंदीस्त शेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मागील काही दिवसांपासून जाळ्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. शनिवारी एका जाळीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने कामगारांनी शेडमध्ये झाकून ठेवलेली दुसरी जाळी दुरूस्तीसाठी घेतली. यावेळी सदरच्या जाळीला शिशाचे छोटे रिंग नसल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. www.konkantoday.com