
शासन निर्णयानुसारच शिक्षक समायोजन होणार, शाळांना पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा
प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शिक्षकांच्या रिक्त पदांची संचमान्यता (समायोजन) प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून शाळांना पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रक्रियेत शासनाने निश्चित केलेल्या नव्या निकषांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळांमधील ५ किलोमीटरचे अंतर आणि किमान १५ विद्यार्थ्यांची पटसंख्या या निकषांचा आधार घेतला जाणार आहे. या संदर्भातील संचमान्यता इतिवृत्त’ निर्णयानुसारच सर्व कार्यवाही केली जाईल आणि यामध्ये शिक्षण विभाग कोणताही फेरफार करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे संचमान्यतेतील पारदर्शकता टिकून राहण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक मंगळवारी सभापती नंदकुमार मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील शैक्षणिक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.www.konkantoday.com



