
यावर्षी गणरायाच्या मूर्तीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढणार
कोकणातील गावागावांमध्ये गणेशमूर्ती चित्र शाळांमध्ये सध्या उत्साहाचे आणि धावपळीचे वातावरण पहायला मिळत आहे. मातीचे ढीग उपसण्यापासून ते मूर्तीला आकार देणे, ती सुकवणे आणि प्राथमिक रंगकाम करणे अशी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. कोकणात आजही अनेक ठिकाणी पारंपरिक शाडूच्या मातीचे गणपती बनवण्यावर भर दिला जातो. बाप्पाचे लोभस रूप साकारण्यासाठी मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त झाले आहे. यावर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे.
त्यामुळे मूर्तीचे दर २० टक्क्यांनी वाढवणे मूर्तीकारांना भाग पडले आहे. शाडूची माती, वाहतूक खर्च किमतीत वाढ झाली आहे. तसेच मूर्तीला जिवंतपणा आणणारे विविध प्रकारचे रंग, ऑईन पेंट्स आणि ब्रश यांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय कारागिरांची मजुरी, वाहतूक खर्च त्यामुळे मूर्तीच्या किंमती काही अंशी वाढ होणार आहे.




