
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज फिरणार BMC चा बुलडोझर!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील भेंडी बाजार येथील मालमत्तेवर आज मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) तोडक कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत त्याचे वडिलोपार्जित घर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवला जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने ही तयारी केली आहे.
भेंडी बाजार परिसरातील दाऊदची ही इमारत बरीच वर्षे जीर्ण अवस्थेत पडून होती. ती अत्यंत धोकादायक बनल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या धोक्याची दखल घेत पालिकेने ही वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कारवाई केवळ प्रशासकीय पातळीवरील नसून, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतरच हे पाडकाम केले जात आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या मालमत्तेवर होत असलेल्या या कारवाईमुळे सध्या सर्वत्र याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने ही तयारी केली आहे.
भेंडी बाजार परिसरातील दाऊदची ही इमारत बरीच वर्षे जीर्ण अवस्थेत पडून होती. ती अत्यंत धोकादायक बनल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या धोक्याची दखल घेत पालिकेने ही वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कारवाई केवळ प्रशासकीय पातळीवरील नसून, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतरच हे पाडकाम केले जात आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या मालमत्तेवर होत असलेल्या या कारवाईमुळे सध्या सर्वत्र याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.




