
पुण्यात DJ सेटअप अंगावर पडून महिलेचा मृत्यू; दहीहंडी सेलिब्रेशनदरम्यानचा थरार
राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असतानाच पुण्यात मात्र या उत्सवाला गालबोट लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या डीजे सेटअपमुळे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.या महिलेच्या अंगावर डीजेचा अवजड सेटअप पडल्याने ती गंभीर जखमी झाली आणि उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. हा सारा थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मयत महिला कोण?
पिंपरी-चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी हा विचित्र अपघात घडला. दहीहंडी कार्यक्रमानंतर झालेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय. विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमानंतर लोखंडी सांगाडा (कमान/स्ट्रक्चर) काढताना त्याचा अवजड भाग अचानक कोसळला. हा भाग कोसळताना अनेकजण स्वत:ला वाचवताना इकडे तिकडे पळाले. मात्र या डीजेकडे पाठ करुन उभ्या असलेल्या सलमा सलाउद्दीन पठाण (वय 45) यांचं लक्षच गेलं नाही. त्यांना आपल्यावर डीजे पडतोय हे कळेपर्यंत उशीर झाला आणि हा सारा मोठा सेटअप सलमा यांच्या डोक्यावर पडला. त्या गंभीर जखमी झाल्या.हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कशाप्रकारे सलमा यांच्यावर हा सेटअप पडला. त्यानंतर या ठिकाणी कसा गोंधळ उडाला




