संगमेश्वर तालुक्यात रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी अनधिकृत खोदकाम.रिलायन्स जिओ कंपनीची मनमानी.

संगमेश्वर तालुक्यात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.कंपनीने स्वतःची खाजगी केबल टाकताना नियमांचा भंग करून रस्त्यालगतच खोदकाम करुन केबल टाकण्याचे काम सुरू केले असून कंपनीच्या विरोधात भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी यांना निवेदन सादर केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंपनीला अनेक अटी व नियम घालून केबल टाकण्याची परवानगी दिली आहे.रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतराच्या बाहेर केबल टाकण्याची अट असताना कंपनीने अनेक ठिकाणी साईडपट्टी खोदून केबल टाकली आहे.त्यामुळे शासनाच्या नुकसानासोबतच केलेल्या खोदकामामुळ्ये पावसाळ्यात वाहनांचे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.खाजगी जागेत केबल टाकताना जागामालकांची संमती घेणे आणि योग्य मोबदला देणे आवश्यक असताना देखील कोणाचीही संमती न घेता केबल टाकून शेतकर्‍यांच्याच शेताचे नुकसान कंपनीने केले आहे.याबाबतीत उप विभागीय अभियंता देवरुख यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करूनही कंपनीच्या मनमानीकडे दुर्लक्ष करण्यात आले.संबधित अधिकार्‍यांनी काम सुरू असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कंपनीच्या कामाची आणि जबाबदार अधिकारी यांच्या चौकशीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच कंपनीने अनधिकृत पणे टाकलेली केबल पुन्हा नव्याने १५ मीटरवर टाकावी,शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी भाजपचे डॉ.अमित ताठरे,युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम,योगेश शिंदे,युवामोर्चा तालुका सरचिटणीस संकेत खामकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button