
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील खाडीपात्रातील रेती उपशाचा पंचनामा
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील मुख्य मार्गावरील पुलाच्या नवीन कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यासाठी बनविण्यात आलेल्या ऍप्रोच रस्त्याच्या भरावासाठी केलेल्या उपशाची तेथील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करण्यात आला आहे. सदर अहवाल कारवाईसाठी गुहागर तहसिलदारांकडे दाखल झाला असून आता यावर दंडात्मक कारवाई होते का याकडे लक्ष लागले आहे. www.konkantoday.com