रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीमधील जे. के. फाईल्स  गद्रे मरीन चौपदरीकरण सुरू


रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीमधील जे.के. फाईल्स ते गद्रे मरीन या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावरून एमआयडीसीत प्रवेश करणार्‍या या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे थेट चौपदरीकरण काम सुरू झाले आहे. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भविष्यात सुरू होणार्‍या रत्नागिरी विमानतळावरून शहरात ये-जा हाच मुख्य मार्ग ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष करण्यासाठी महामार्गाला जोडणारा सुरुवात झाली आहे. हा रस्ता रत्नागिरीच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाचा मुख्य पाठीचा कणा मानला जातो. जागतिक पातळीवर सी-फूड निर्यात करणार्‍या गद्रे मरीनसह अनेक प्रक्रिया उद्योगांची अवजड वाहतूक याच मार्गावरून होते. तसेच भारतीय तटरक्षक दल, अभियांत्रिकी व पदवी महाविद्यालय याच परिसरात आहेत.
सुमारे १ हजार ८०० मीटर (१.८ किमी) लांबीच्या या रस्त्यावर अवजड वाहतूक आणि पावसामुळे खड्डे पडल्याने नागरिक व वाहनधारकांमधून सातत्याने डागडुजीची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी रस्त्यांच्या कायापालटावर विशेष भर दिला आहे. त्यानुसार या रस्त्याचे पूर्णपणे कॉक्रिटीकरण करून चौपदरीकरण केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button