जयगड येथील जेएसडब्ल्यू बंदरात  उभ्या असलेल्या ’त्या’ जहाजावरील एलपीजीचा अखेर ५२५ डॉलरने लिलाव


जयगड येथील जेएसडब्ल्यू बंदरात गेल्या काही काळापासून अडकून पडलेल्या एलपीजी आमीर गॅस या आंतरराष्ट्रीय जहाजावरील आणि किनार्‍यावरील टँकमधील द्रवीभूत पेट्रोलियम गॅसचा लिलाव अखेर पूर्ण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकलपीठाने या लिलावातील सर्वाधिक रकमेची बोली मंजूर केली.
’मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड’ या कंपनीची यशस्वी बोलीदार म्हणून निवड केली आहे. या निर्णयामुळे बंदरातील गॅ सचा साठा सुरक्षितरित्या हलवण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, एलपीजी आमीर गॅस या जहाजावर १ हजार ७२९ मेटिक टन आणि जयगड बंदरातील टँकमध्ये १५० मेट्रिक टन असा एकूण १ हजार ८८० मेट्रिक टन एलपीजी वायूचा साठा उपलब्ध आहे. या संपूर्ण साठ्याचा लिलाव करण्यासाठी मुंबई उप-शेरिफ कार्यालयाकडून प्रक्रिया राबवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button