अर्णब’ चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, आज आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार?


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘अर्णब’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकत असून उद्या २८ ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनापट्टीवर धडकणार आहे. या ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागात वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागांत पूरस्थिती किंवा भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अर्णब’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने बहुतांश राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम होणाऱ्या भागांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती निवारण दलांची पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

‘अर्णब’ बुधवारी पहाटे धडकणार?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘अर्णब’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकत असून आज (२८ ऑक्टोबर) पहाटे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनापट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री २ ते ४ च्या दरम्यान हे अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे.अर्णब’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांतही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भात सर्वदूर तर मराठवाड्यातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेमहाराष्ट्राला या चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरीही मंगळवार ते गुरुवारपर्यत राज्यातील काही भागात पावसाचा प्रभाव राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. अर्णब चक्रीवादळ ज्या भागातून किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, त्या परिसरात जोरदार वारे आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक धोका आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button