कोलकाताच्या चोरबागान दुर्गा मंडपात चेंगराचेंगरी, १७ ठार


कोलकाता येथील मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपामध्ये सप्तमीच्या संध्याकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच २५ ते ३० जखमींना कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, सप्तमीच्या संध्याकाळी मंडपामध्ये हजारो भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. यादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बाहेर उभे असलेले भाविक तात्काळ आश्रयासाठी मंडपाच्या दिशेने धावले. दुसरीकडे, आतील लोकांना बाहेर पडता आले नाही आणि बाहेरील गर्दीने रेटारेटी केल्यामुळे तिथे गोंधळ झाला. परिणामी, तात्पुरत्या उभारलेल्या पायऱ्यांवर लोक एकमेकांवर कोसळले. तसेच मंडपाच्या लोखंडी संरचनेचा काही भाग कोसळल्यामुळे जीवितहानी झाली. अवघ्या ५ ते ७ मिनिटांत ही भीषण घटना घडली.चोरबागान पूजा समिती यंदा आपला ९१ वा वर्धापन दिन साजरा करत असून, हा परिसर अतिशय अरुंद आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button