माजी सैनिकांच्या समस्या निवारणासाठी खेड आणि चिपळूणमध्ये नोव्हेंबरमध्ये विशेष दौरे; जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा पुढाकार


रत्नागिरी, दि. २७ ): जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या विविध प्रशासकीय व वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी नोव्हेंबर २०२६ मध्ये खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांच्या विशेष दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यांदरम्यान माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणारे अभिलेख कार्यालय विषयक (Record Office) प्रश्न, पेन्शनच्या अडचणी, महासैनिक पोर्टलवर नवीन नोंदणी (Registration) तसेच इतर विविध प्रशासकीय तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे.
दौऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक:

  • २ नोव्हेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • ३ नोव्हेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • १६ नोव्हेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • १७ नोव्हेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • २३ नोव्हेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • २५ नोव्हेंबर (बुधवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: सुनिल कदम)
  • ३० नोव्हेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड (कल्याण संघटक: राहुल काटे)
  • १ डिसेंबर २०२६ (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण (कल्याण संघटक: सुनिल कदम)
    सोबत आणावयाची आवश्यक कागदपत्रे:
    शिबिराचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या वारसांनी मूळ कागदपत्रांसह (Original) प्रत्येकी दोन छायांकित प्रती (झेरॉक्स) सोबत ठेवणे आवश्यक आहे:
  • महासैनिक पोर्टलवर (www.mahsainik.maharashtra.gov.in) नोंदणी केलेली पावती
  • डिस्चार्ज बुक (Discharge Book)
  • पी.पी.ओ. (PPO) ची प्रत
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड
  • आधार कार्ड व आधारशी जोडलेला चालू मोबाईल क्रमांक
    या दौऱ्यांचा व समस्येच्या जागीच होणाऱ्या निवारणाचा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबीयांनी निश्चित केलेल्या दिवशी उपस्थित राहून पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button