
धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणील काल सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली मतमोजणी अजूनही सुरुच आहे.आज (28 ऑक्टोबर) सकाळी 7 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनूसार महाविकास आघाडीचे 3 उमेदवार, तर महायुतीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत.
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतांत मविआच्या हर्षदा देशमुख आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानी भाजपच्या स्मिता जाधव आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांत भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप आले असून रासप पुरस्कृत उमेदवार दत्ता सावंत तिसऱ्या स्थानावर आहेत. पुणे शिक्षक मतमोजणीत 1 हजार 675 मतं बाद ठरली. तर 51 हजार 511 मतं वैध ठरलीत. त्यामुळे जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित केला गेला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी 2 लाख 26 हजार 224 मते वैध ठरली आहेत. विजयासाठी 1 लाख 13113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. पहिल्या फेरीत 84 हजार मतांची मोजणी केली जात आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी 28 हजार 536 मतांसह आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुधाकर कोहळे 27 हजार 751 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळेंनी आतापर्यंच 14 हजार 243 मतं मिळवली आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. पहिल्या फेरीत 84 हजार मतांची मोजणी केली जात आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी 28 हजार 536 मतांसह आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुधाकर कोहळे 27 हजार 751 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळेंनी आतापर्यंच 14 हजार 243 मतं मिळवली आहे.अमरावती शिक्षक मतदारसंघातील 18 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3,493 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8,229 मतं तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4736 मतं आहेत तर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4,715 मतं आहेत. दरम्यान 26 उमेदवारांपैकी 15 उमेदवार रिंगणाच्या बाहेर आहेत.छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शपचे प्रतापसिंह पाटील हे 10 हजार 934 मतांनी आघाडीवर आहेत. डॉ. प्रतापसिंह पाटील 54 हजार 095 मतांनी आघाडीवर आहे तर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण 43 हजार 161 मतांनी दुसऱ्या स्थानी आहेत.




