
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली रावणंगवाडी येथील विषारी औषध प्राशन केलेल्या ’त्या’ तरुणाचा मृत्यू
विषारी औषध प्राशन केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कर्ली रावणंगवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिष दीपक रावणंग असे मृत तरुणाचे नाव आहे. आशिष याने २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वा. सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात जाऊन हमला ५५० नावाचे विषारी औषध प्राशन केले.
अचानक प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी. आर रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचार सुरू असताना ३ सप्टेंबर रोजी आशिष याचा मृत्यू झाला. त्याचा पार्थिव कर्ली येथील निवासस्थानी आणून ४ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.




