
जर किरण सामंत यांनी कमळ चिन्हाचा स्टेटस लावला असता तर आपल्याला आनंद झाला असता-आमदार नितेश राणे
मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यानी व्हाट्सअप ला कोणता स्टेटस लावावा हा त्यांचा प्रश्न आहे.आपण एक भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून पक्षाची भूमिका मांडणे, पक्षाची बाजू घेणे, महायुतीची बाजू घेणे ही माझी जबाबदारी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग चा एन डी ए चा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मदत करण्याचे कृत्य होऊ नये ही अपेक्षा आहे. जर किरण सामंत यांनी कमळ चिन्हाचा स्टेटस लावला असता तर आपल्याला आनंद झाला असता व त्यांचे आपण अभिनंदनही केले असते अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.
किरण सामंत यांनी मशाल चिन्हाचा लोगो व्हाट्सअप स्टेटस ला लावला दोन तासांनी तो काढला पत्रकारांनी आमदार नितेश राणेंना विचारले असता ते म्हणाले किरणजी सामंतनी कोणता स्टेटस लावावा कोणत्या राजकीय पक्ष स्वीकारावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्यानी काय करावे हाही प्रश्न त्यांचा आहे. मात्र जर त्यानी कमळ चिन्हाचा लोगो लावला असता तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला आनंद झाला असता व मी सुखावलो असतो. महायुतीचे नुकसान होऊ नये तसे काम करू नये अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून आहेत त्यामुळे हा संदेश ही आहे किरणजी सांमतांकडे लवकरच पोहोचेल असेही नितेश राणे म्हणाले.
www.konkantoday.com